पठान : दमदार.. शानदार.. जबरदस्त!!!
पठान : दमदार.. शानदार.. जबरदस्त!!! Rating 🌟🌟🌟🌟 4/5 Hindi | Action Thriller | 2023 यशराज फिल्म्सच्या एक था टायगर, टायगर जिंदा है, वॉर या स्पाय युनिवर्स मधील पठान हा चौथा आणि एक जबरदस्त ऍक्शन थ्रीलर चित्रपट म्हणता येईल. पठानचा पहिला टीझर आला तेव्हापासूनचं पिक्चरची लोक आतुरतेने वाट बघत होते.. त्यात शाहरुख खानचा चार ते पाच वर्षानंतर येणारा हा चित्रपट. पिक्चरचा ट्रेलर पण तेवढंच दणक्यात येऊन आतुरता आणखीनच वाढवून गेला. अखेर पिक्चर 25 जानेवारीला रिलीज झाला आणि पठानने सगळ्यांनाच चकित करून सोडलं. ट्रेलर बघून आपण काहिबाहीसा अंदाज बांधतो कि पिक्चर असा असा असेल पण पठानच्या बाबतीत लावलेले सगळेच अंदाज चुकीचे ठरतील. पिक्चरची सुरुवात होते पाकिस्तानमधून..भारतात सेक्शन 370 रद्द केल्यामुळे पाकिस्तानचे जनरल कादीर नाराज असतात.. भारताकडून काहीही करून काश्मीर हिसकावून घ्यायचंच असा चंग बांधून मैदानात उतरतात.. हि कामगिरी ते जिम म्हणजेच जॉन अब्राहमवर सोपवतात.. जॉन अब्राहम ची एन्ट्री पण तितकीच पॉवरफुल आहे. व...