पठान : दमदार.. शानदार.. जबरदस्त!!!

 पठान : दमदार.. शानदार.. जबरदस्त!!!

Rating 🌟🌟🌟🌟  4/5

Hindi | Action Thriller | 2023

         यशराज फिल्म्सच्या एक था टायगर, टायगर जिंदा है, वॉर  या स्पाय युनिवर्स मधील  पठान  हा चौथा आणि एक जबरदस्त ऍक्शन थ्रीलर चित्रपट म्हणता येईल. पठानचा पहिला टीझर आला तेव्हापासूनचं पिक्चरची लोक आतुरतेने वाट बघत होते.. त्यात शाहरुख खानचा चार ते पाच वर्षानंतर येणारा हा चित्रपट. पिक्चरचा ट्रेलर पण तेवढंच दणक्यात येऊन आतुरता आणखीनच वाढवून गेला. अखेर पिक्चर 25 जानेवारीला रिलीज झाला आणि पठानने सगळ्यांनाच चकित करून सोडलं. ट्रेलर बघून आपण काहिबाहीसा अंदाज बांधतो कि पिक्चर असा असा असेल पण पठानच्या बाबतीत लावलेले सगळेच अंदाज चुकीचे ठरतील. 


        पिक्चरची सुरुवात होते पाकिस्तानमधून..भारतात सेक्शन 370  रद्द केल्यामुळे पाकिस्तानचे जनरल कादीर नाराज असतात.. भारताकडून काहीही करून काश्मीर हिसकावून घ्यायचंच असा चंग बांधून मैदानात उतरतात.. हि कामगिरी ते जिम म्हणजेच जॉन अब्राहमवर सोपवतात.. जॉन अब्राहम ची एन्ट्री पण तितकीच पॉवरफुल आहे. विशाल शेखर ने एन्ट्री बॅकग्राऊंड म्युजिक खूपच जबरदस्त दिलंय.. पहिल्या वीस मिनिटातच तिकिटाचे निम्मे पैसे वसूल होतात.. जिमच्या या मिशन बद्दल पठानला खबर मिळते.. विशेष म्हणजे जिम पण आधी एक RAW एजन्ट असतो.. पण भूतकाळात त्याच्याबाबतीत घडलेल्या वाईट घटनामुळे तो भारताविरुद्ध चीड खाऊन असतो..आणि त्याला थांबवण्यासाठी पठान दुबईला जातो पण त्यात त्याला काही यश येत नाही..त्यानंतर पठानची भेट होते रुबीया (दीपिका पादुकोण)सोबत.. ती एक पाकिस्तानी ISI एजन्ट असते आणि जिम सोबत काम करत असते..जिमला धोका देऊन मध्येच पठाणच्या बाजूने लढते आणि पुन्हा पठानला सुद्धा धोका देते.. पिक्चरमध्ये भरपूर ट्विस्ट आणि टर्न्स आहेत..दोन तास सवीस मिनिटांच्या या पिक्चर मध्ये भरपूर ऍक्शन बघायला मिळेल..भारतावर बायॉलॉजिकल अटॅक करण्याचा जिमचा प्लॅन कितपत यशस्वी होतोय हे मोठ्या पदड्यावरच पाहणं चांगलं होईल..


           शाहरुखचे सिक्स पॅक् ऍब्स आणि दीपिकाचा रोमँटिक डान्स "बेशरम रंग " या गाण्यात दाखवला आहे. शाहरुखची या वयातली ती बॉडी बघून तोंडातून आपसूकच वाह निघते.. जॉन अब्राहमने विल्लेनची भूमिका खूप चांगल्या पद्धतीने निभावलेय..जॉन खरंच खूप भाव खाऊन जातो..डिम्पल कपाडियाने साकारलेली पठाणच्या बॉसची भूमिका उल्लेखनीय आहे.. आशुतोष राणा कर्नल लुथरा च्या भूमिकेत शोभतोय..स्टोरी आणि डायलॉग अगदी कमाल आहेत.. 'पार्टी 'पठान' के घर रखोगे तो मेहमानवाजी के लिए 'पठान' तो आएगा ही. साथ में पटाखे भी लाएगा.' एक सोल्जर ये कभी नहीं पूछता कि देश ने उसके लिए क्या किया, बल्कि वो ये पूछता है कि वो देश के लिए क्या कर सकता है जय हिंद.' यासारखे डायलॉग ऐकून अंगावर काटा येतो.. शाहरुखच्या एक अन एक डायलॉग वर लोक टाळ्या शिट्या वाजवत होते.


           दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी यावेळी भरपूर मेहनत घेतलेली दिसून येतेय. स्पाय युनिवर्स मध्ये यशराज फिल्म्स आणि दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद नवनवीन स्पाय एजन्ट एकत्र आणणार अशी अफवा होती.. पठान मधील एक एक सस्पेन्सने थिएटर मध्ये लोकांना टाळ्या आणि शिट्ट्या वाजवायला भाग पाडलं.पिक्चर मध्ये काही गोष्टी सायंन्सच्या पलीकडे वाटतील पण हा पिक्चर बघताना लॉजिक बाजूला ठेऊन बघितलं तर बाकी सगळं उत्तमच आहे..


               येणाऱ्या काळात टायगर (सलमान खान), कबीर ( ह्रितिक रोशन ) आणि पठान (शाहरुख खान ) यशराज बॅनरच्या पुढील स्पाय सिरीज मध्ये एकत्र पाहायला मिळतील एवढं मात्र पठाणचा अर्धवट शेवट नक्की सांगून जातो.

Comments

Popular posts from this blog

Bloody Daddy: Excellent..!

Asur - 2 : The Rise Of The Dark Side

Super Pumped: The Battle for Uber Series Review